
अमळनेर : ‛कोई इस्थान लिखेंगे ना पाकिस्तान लिखेंगे ,
है सबसे अच्छा अपना मुल्क हिन्दुस्तान लिखेंगे ,
सवाल आजायेगा जिसदिन तिरंगे तेरी इज़्ज़त का ,
हम अपने खून के कतरो से तेरी शान लिखेंगे’ अशा शब्दात अजीम शेख यांनी देशाभिमान जागृत करून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला. अमळनेर शहरातील मुस्लिम यंग सर्कल तर्फे १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ‛एक शाम स्वतंत्रता के नाम ऑल इंडिया मुशायरा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध सर्जन डॉ अनिल शिंदे होते. शहरात काही दिवसांपूर्वी समाज कंटक हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा कट करीत असल्याने हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसिद्ध शायर हमीद भुसावली , आरिफ सैफी(हैद्राबाद) , चांदणी शबनम (कचौचा उत्तरप्रदेश) ,कमर एजाज (औरंगाबाद ) ,साबीर मुस्तफाबादी (जळगाव) ,सोहेल आझाद (मालेगाव ) ,इब्राहिम सागर (धुळे) , मतीन अन्वर (धुळे) सहभागी झाले होते.
यावेळी साबीर मुस्तफा आबादी यांनी ‛हमारी आन बनता है, हमारी शान बनता है,
हमारे नाम से ही अमन की पैहचान बनता है,
कोई हिन्दू कोई मुस्लिम कोई हो सिख ईसाई,
लहू जब सबका मिलता है तो हिंदुस्तान बनता है’ म्हणत सर्व जाती धर्मभाव व एकतेचा संदेश दिला. तर कमर एजाज यांनी एकजुटीचा संदेश देताना सांगितले की ‛हालात ज़माने के संभलने नही देते,
हम साथ मे चलते है तोचलने नही देते,
नफरत की हवाओ को ज़माने से मिटादो,
उल्फत के चरागो को जो जलने नही देते’
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एजाज गफ्फार मलिक , पुलिस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर ,पोलीस निरीक्षक विकास देवरे,कांग्रेस नेते के डी पाटिल मा. आमदार डॉ बी एस पाटिल, संदीप घोरपडे , प्रकाशभाई पाटील , प्रशांत निकम ,करण पवार , चिराग काझी, हाजी नसीरूद्दीन , फय्याज भाई,तिलोत्तमा पाटील , ऍड ललिता पाटिल, नयाना कैलास पाटिल,बी के सूर्यवंशी, गोकुल बोरसे,राजू फफोरेकर सचिन पाटील, श्याम पाटील , रीता बाविस्कार, प्रा अशोक पवार , रणजित शिंदे , पंकज साळी होते. कार्यक्रमाचे आयोजन सैय्यद अजहर अली, रिज़वान मनियर,इम्राम भाया यांनी तर कार्यक्रमाला यशस्वी करण्या साथी आरिफ भाया , सईद हाजी अजीम शेख ,आसिफ बागवान , मुश्ताक बागवान , अबरार भाया , आसिफ अली शाहरुख शेख , अलत्मश शेख, जफर भाया, सलमान बागवान , रजा पठाण , अनम पठाण अमजद पठाण ,रिजवान पठाण यांनी प्रयत्न केले.




