
अमळनेर : तालुक्यातील खापरखेडा व रुंधाटी शेत शिवारातून अज्ञात चोरट्यानी सुमारे १५ हजार किमतीच्या २७०० मीटर तारा चोरून नेल्याची घटना ७ रोजी उघडकीस आली. प्रदीप कुमार दिनेश परदेशी सहाययक अभियंता याना ७ ऑगस्ट रोजी पातोंडा शिवारातील वायरमन संभाजी पाटील यांनी कळविले की रुंधाटी शिवारातील हिरालाल यांच्या शेतातील डीपीवरून तीन गाळ्यातल्या १८ मीटर विद्युत तारा चोरीस गेल्या आहेत. तर खापरखेडा येथील वायरमन विजय पाटील यानेही कळवले की भीमा दादा यांच्या शेतातील ९०० मीटर लांबीच्या ५ हजार रुपयांच्या विद्युत तारा चोरीस गेल्या आहेत. अभियंत्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विजया भोई करित आहेत.




