
अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खु,पिंपळे बु व आटाळे गावातील शाळकरी मुले ही दररोज शाळेत येजा करत असताना अमळनेर आगारातील बसेस पिंपळे येथील विद्यार्थ्यांना घेऊन जात नाहीत, असा गंभीर आरोप करीत सकाळी ९.५० वाजेच्या सुमारास या तिन्ही गावातील शाळकरी मुली मुलांनी रास्तारोको आंदोलन केले. या वेळी जवखेडा ते अमळनेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बसेस व इतर वाहनांच्या मोठी गर्दी झाली होती. या मुलांच्या आंदोलनात त्याचे पालक देखील धावून आले होते
ह्या रास्ता रोको आंदोलन भर रस्त्यावर एक ते दीड तास मुलांनी अमळनेरकडे जाणाऱ्या तसेच जवखेडाकडे जाणाऱ्या सर्व बसेस अडवून घेतल्या होत्या. लहान मुले बसेस अडवून आंदोलन करत असल्याने सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी पूर्ण वेळ बस स्टॉप थांबून मुला मुलीची काळजी घेऊन त्यांना शांततेचे आवाहन केले. थेट कंडक्टर व ड्रायव्हर यांनी वाहतूक नियंत्रक दीपक बोरसे यांच्याशी फोनवर संवाद साधला. बसची कमतरता असून मात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असेही त्यांनी सांगितले.अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थी व पालकांची समजूत काढुन बस मार्गस्थ केली.




