
अमळनेर:- तालुक्यातील अंतुर्ली रंजाणे वि.का.स. सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी दाजभाऊ यांची तर व्हॉईस चेअरमन पदी विमल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सदर निवडीच्या सभेत चेअरमनपदासाठी शिवाजी पाटील यांचे नाव संचालक सचिन पाटील यांनी सुचवले, तर छोटू नीलकंठ पाटील यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हॉईस चेअरमन पदासाठी विमल रामदास पाटील यांचे नाव आबा वाल्मीक पाटील यांनी सुचवले तर सुभाष वामन सोनवणे यांनी अनुमोदन दिले. सदर निवडणूक सब रजिस्टर ऑफिस चे एस.पी.महाजन यांच्या अध्यक्षतेत पर पडली तर संस्थेचे सचिव कृष्णकांत. भावसार यांनी निवडणूक कामत सहकार्य केले .
सभेस सचिन पाटील, छोटू पाटील, सुभाष सोनवणे , देवदास पवार, विमल पाटील, मालती पाटील, किशोर पाटील, आबा पाटील,भास्कर सोनवणे, नारायण पाटील उपस्थित होते
सदर निवडीबद्दल मंत्री ना.अनिल पाटील माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, भागवत पाटील, अनिल शिसोदे, एल. टी.पाटील, हिरालाल पाटील, राहुल पाटील, प्रा. सुरेश पाटील, भोजमल पाटील यांनी देखील अभिनंदन केले आहे.




