
अमळनेर:- के टी वेयर बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या ५० वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २१ रोजी सकाळी ७ वाजेपुर्वी तालुक्यातील रंजाणे येथे घडली.
विश्वास तुकाराम मालचे (वय ५०) हे रंजाणे येथील बोरी नदीच्या के टी वेयर बंधाऱ्यात पोहायला गेले असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचे जावई संदीप मोरे यांनी मारवड पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.




