
अमळनेर( प्रतिनिधी):- तालुक्यातील दहीवद येथील मंगा चिंधू माळी यांनी आपल्या राहत्या घरी छताच्या लाकडी कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० रोजी घडली. मयताच्या पुतण्या विजयकुमार माळी याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अस्कस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




