
अमळनेर– खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या वतीने संत तुकाराम महाराजांचे वंशज शिवचरित्रकार ह. भ. प. श्री शिरिष महाराज मोरे, श्री क्षेत्र देहू निवास यांचे”राष्ट्रहितातून समाजहित” या विषयावर आज शुक्रवार, दि.23 ऑगष्ट रोजी मौलिक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सदर व्याख्यान सकाळी 11.30 वाजता पूज्य सानेगुरूजी सभागृह, प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे होणार आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खा शि मंडळाचे संचालक हरी भिका वाणी,तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ए.बी.जैन यांची उपस्थिती लाभणार आहे.तरी सर्वानी व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रताप महाविद्यालय, अमळनेर तर्फे करण्यात आले आहे.




