
अमळनेर:- घराबाहेर लावलेली ६५ हजार रुपयांचे पिकअप व्हॅन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १८रोजी रात्री ते १९ रोजी सकाळच्या दरम्यान ताडेपुरा भिमनगर घडली.
राज रावण संदानशीव (रा भीमनगर ताडेपुरा) याने व्यवसायात मंदी असल्याने त्याची पिकअप व्हॅन क्रमांक एम एच १९ सी वाय ९२२७ ही दहा पंधरा दिवसांपासून घरासमोर लावून ठेवलेली होती. १८ रोजी रात्री १० वाजता गाडी घराबाहेरच लावलेली होती. मात्र १९ रोजी सकाळी गाडी जागेवर नव्हती. गाडी चोरीस गेल्याची खात्री झाल्यावर राज संदानशीव याने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.




