
अमळनेर:- येथील स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी सोहळा साजरा करण्यात आला. यात शाळेतील चिमुकले कृष्ण व राधा यांच्या वेशात आले होते. तसेच शाळेतील शिक्षकांनी कृष्णजन्म कसा झाला याचे नाटकाद्वारे सादरीकरण केले. प्रि प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तसेच शाळेत दहीहंडी फोडण्यात आली. यात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
शाळेतील शिक्षकांनी मुलांना कृष्ण लीलांची माहिती सांगितली. यावेळी शाळेचे प्राचार्य विनोद अमृतकर सर उपस्थित होते अशा प्रकारे शाळेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारीवर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले व मुलांनी जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली.




