
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळी ते दहीवद फाटा कडेस जाणाऱ्या रस्त्यावर रुपचंद झगा महाजन यांचे शेताजवळ दोन मोटारसायकल धडकेत एकाच मृत्यू तर दुसरा जखमी झाल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत संजय पिंताबर शेलकर (वय ५४ वर्षे रा. पिंपळी यांनी) दिलेल्या फिर्यादीवरून मोटार सायकल क्रमांक एम एच -१९ डी आर ३७०६ वरील चालक नासीर महेमुद फकीर रा. दहीवद ता. अमळनेर हा सध्या उपचार घेत आहे.
दि १ रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पिंपळी ते दहीवद फाटा कडेस जाणारा रोडवर रुपचंद झगा महाजन यांचे शेताजवळ रोडवर मोटार सायकल चालक नासीर महेमुद फकीर रा. दहीवद ता.अमळनेर याने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल ही रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवून फिर्यादीचे आतेभाऊ सुरेश पुंडलीक महाजन वय ५३ वर्ष रा पिंपळी ता अमळनेर याचे मोटार सायकल क्रमांक एम एच १९ एफ ५६१९ या वाहनाला जोरदार धडक देत समोरुन अपघात करुन स्वताचे दुखापतीस व आते भाऊ सुरेश पुंडलीक महाजन यांचे मरणास तसेच दोघे मोटार सायकलीचे नुकसानीस कारणीभूत झाला आहे. म्हणुन माझी मोटार सायकल क्रमांक एम एच १९ डी आर -३७०६ वरील चालक नासीर
महेमुद फकीर रा. दहीवद ता. अमळनेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो हे. कॉ. विजय भोई हे करीत आहेत.




