
अमळनेर:- तालुक्यातील टाकरखेडा येथिल , मातोश्री इंदू ताई शेतकरी उत्पादक कंपनीच्या चेअरमन पुनम भटू पाटील यांना लाईफ बलुम इंडियाच्या वतीने महाराष्ट्र आयकाॅन अवॉर्ड २०२४ नाशिक विभागीय कृषि उपसंचालक जगदीश पाटील, कृषिभुषण निकम, तसेच जोशी यांच्या हस्ते देण्यात आला.
पूनम पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील 100 शेतकरी गटांची स्थापना करून टाकरखेडा येथे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून,कृषि सेवा केंद्र, कृषि अवजारे बँक, शेतमाल खरेदी केंद्र सुरू करून परिसरातील शेतकर्यांच्या विकास साधत शेतमाल प्रक्रिया उद्योग व शेतमाल साठवण गोदाम बांधकाम सुरू आहे. धरणगाव पंचायत समितीतचे सभापती प्रेमराज पाटील, वैद्यकीय सेल्स संचालक डाॅ. नितीन पाटील, भगवती मेडिकल चे संचालक भाऊसाहेब पाटील, यशदा मास्टर्स ट्रेनर भटू पाटील, प्रविण पाटील यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस साठी शुभेच्छांचा दिल्या.




