
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त), राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अरुण जैन हे होते,त्यांनी यावेळी महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्तविक इतिहास विभाग प्रमुख डॉ.धनंजय चौधरी यांनी केले तर प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा.विजय साळुंखे यांनी करून दिले.या वेळी मंचावर खा.शि.मंडळाचे सह सचिव तथा अधिसभा सदस्य डॉ.धिरज वैष्णव, उप प्राचार्य डॉ.विजय तुंटे, डॉ.विजय मांटे, डॉ.कल्पना पाटील, डॉ.धनंजय चौधरी,प्रा.अवित पाटील उपस्थित होते.
प्रस्तुत साने गुरुजी सभागृहात इतिहास संशोधक डॉ.भी ना पाटील यांचे सामाजिक शास्त्रातील संशोधन या विषयावर मूलभूत स्वरूपाचे व्याख्यान झाले,ते म्हणाले की मानवाच्या गरजा ह्या अनंत आहेत,आपली जिज्ञासा व उत्सुकता लक्षात घेऊन विषयाचा सखोल अभ्यास करावे. सामाजिक शास्त्रात जवळपास 64 विषयांचा समावेश होतो, या अंतर्गत शास्त्राचा अभ्यास करण्याची एक रीत पद्धतशीरपणे पुढे आली.
सदरच्या कार्यक्रमास अधिसभा सदस्य प्रा.डॉ.संदीप नेरकर,डॉ.निलेश चित्ते,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.रवी बाळसकर, प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.विलास गावित,डॉ.रवींद्र मराठे, प्रा. भाग्यश्री जाधव,प्रा.दिलीप तडवी, डॉ.हर्ष नेतकर, प्रा. प्रसाद मुठे,प्रा.सोनूसिंग पाटील,प्रा.प्रियंका चावडा, प्रा. विक्रांत निकम,प्रा.कोकणी यांच्या सह सामाजिक शास्त्रातील 70 विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी टी वाय बी ए च्या अंतिम वर्षात व एम ए प्रथम वर्षात पहिले आलेले भाग्यश्री महाले यांचा सत्कार माजी प्राचार्य भी ना पाटील यांनी केले.प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अवित पाटील यांनी केले तर आभार प्रा.भाग्यश्री जाधव यांनी मानले.




