अमळनेर:- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल मध्ये ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचे कार्य करत स्वयंशासन दिन साजरा केला.
याप्रसंगी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी ५४ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका बजावली.विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू देऊन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य केलेल्या विद्यार्थ्यांनी अनुभवातून मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक ए.डी.भदाणे,पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे,सी.एस.सोनजे,शिक्षक प्रतिनिधी एस.पी. वाघ,मुख्य लिपिक शाम पवार तसेच सकाळ व दुपार विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.