
अमळनेर : शेतातील भिंत तोडून व १५० फूट पायीपलायीन तोडून नुकसान करणाऱ्या दहिवद येथील दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता जगन्नाथ पाटील हिने फिर्याद दिली की मी गुडघ्याच्या ऑपरेशन साठी मुलांकडे गेली असताना संभाजी नथु पाटील व आशाबाई संभाजी पाटील यांनी मे महिन्यात तिच्या शेतातील भिंत आणि १५० फूट पाईप लाईन खोदून ठेवली होती. त्यातील १५ पाईप चोरीला गेले होते. तसेच याबाबत २७ ऑगस्ट रोजी त्यांना बोलायला गेली असता त्यांनी शिवीगाळ केली व सात पाईपांची तोडफोड केली. यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील तपास करीत आहेत.




