
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील महादेव मंदिरावर ३१ फुटाचा त्रिशूल ३१ ऑगस्ट रोजी लावण्यात आला.
यावेळी संपूर्ण गावात त्रिशूलाची मिरवणूक मोठ्या उत्साहाने सांप्रदायिक पद्धतीने काढण्यात आली. मिरवणूकीत प्रसंगी मुलींनी डोक्यावर कळस घेऊन सहभाग घेतला. महिला व बालगोपाल व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत हजेरी लावली. मिरवणूक गावातून जाताना भाविकांनी घरोघरी आरती व पूजा केली. त्रिशूलाची स्थापना क्रेनच्या साह्याने करण्यात आली. क्रेनच्या साह्याने सागर चौधरी यांनी पुष्पहार अर्पण केले. हा त्रिशूल मांडळ ता. अमळनेर येथील ब्रिजलाल गुलाब सुतार यांनी बनवला तर रंगकाम प्रवीण वाघ व शुभम लोहार यांनी केले. यावेळी मंदिरावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प.माऊली भजनी मंडळाने भजन किर्तनाने मिरवणुकीत भक्तिमय रंग भरला होता. जय भोले मित्र मंडळच्या सहकार्याने त्रिशूल बसवण्यात आला.




