
जानवे येथून महाविद्यालयीन इमारतीचे ४० हजार रुपयांचे लोखंड चोरी
अमळनेर : शहरातील प्रताप मिल कंपाऊंड मधून एका घरातून ६९ हजार रुपयांची रोख रक्कम व जानवे येथून महाविद्यालयीन इमारतीचे ४० हजार रुपयांचे लोखंड चोरून नेल्याची घटना घडली आहे.
विजय ब्रिजलाल पाटील (रा प्रताप मिल कंपाऊंड) यांनी फिर्याद दिली की ,९ रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास शेजारील चेतन चौधरी व प्रकाश जैन यांनी फोन वर कळवले की तुमचे घरचे कुलूप तोडलेले आहे व घराचा दरवाजा उघडा आहे. विजय पाटील यांनी घरी येऊन पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडला होता. कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १५ हजार रुपये रोख २४ हजार रुपये किमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या , ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत असा एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल नाना पवार करीत आहेत.
रामकृष्ण मधुकर पाटील (रा नवलनगर) यांनी फिर्याद दिली की, जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे एम के पाटील कला वाणिज्य महाविद्यालयाचे बांधकाम अमळनेर तालुक्यातील जानवे येथे सुरू आहे. ३० ऑगस्ट रोजी तेथे पाया भरण्यासाठी कापलेले लोखंड आणि कॉलम उभे केलेले विविध मापाचे ४० हजार रुपयांचे लोखंड अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.




