
अमळनेर:- अमळनेर – धुळे रस्त्यावरील डांगर गावाजवळ झालेल्या अपघातात एक जण मयत झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
८ रोजी नावरा ता.धुळे येथील धनराज भिकन पाटील(वय – ४०) हा एमएच १८ बी.एस. ११८९ या वाहनाने दुपारी २ वाजून ४५ वाजता धुळे कडून अमळनेर कडे जात असताना डांगर गावाजवळील नाल्याच्या कठड्याला जोरात मोटार सायकल धडकल्याने त्याचा भीषण अपघात झाला.
डांगर ग्रामस्थांनी धनराज याचे काका अशोक पाटील यांना कळविले,अशोक पाटील यांनी गावातील काही लोकांना सोबत घेत धनराज याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता मृत घोषित केले.अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ.कैलास शिंदे करीत आहेत.




