अमळनेर:- येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिरासमोर सोमवारी क्रेनच्या साह्याने 21″ फुट त्रिशूलची स्थापना करण्यात आली.
रविवारी दुपारी 4 ते 7 वाजे दरम्यान शिरुड नाका, वडचौक, पाचपावली देवी, बसस्टँड, डॉ बहुगुणे, भगवाचौक, मुंदडा नगर, विद्या विहार कॉलनी इ.परिसरातून त्रिशूलची वाद्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी पूजा करण्यात आली मिरवणुकीत रवि पाटील, प्रशांत निकम, ईश्वर महाजन, कपिल पाटील, संजय पाटील, राहुल शिंपी, अमोल पाटील, कल्पेश साळुंखे, सुनिल शिंगाणे, मोहित पवार, भैय्या साळुंखे, तेले सर, सागर पाटील, किरण अहिरे, विवेक तेले, मिलिंद वारुळे, प्रविण गुजर तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.