
अमळनेर – राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित्त ‘अमळनेर युवा परीट धोबी मंडळ’ व ‘परदेशी धोबी समाज’ आणि ‘जीवनश्री व जीवन ज्योती ब्लड बँक अमळनेर’ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

गोपाला गोपाला देवकीनदंन गोपाला या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम संत गाडगेबाबा उद्यानात श्री संत गाडगे बाबा यांच्या स्मारकाचे नंतर संत गाडगेबाबा चौकातील स्मारकाचे पूजन व मार्ल्यापण माजी उपनगराध्यक्ष चंदूसिंग परदेशी, माजी नगरसेवक परशुराम महाले, अरुण जाधव, परीट मंडळाचे अध्यक्ष रवींद्र जाधव, सचिव विजय वाघ, परदेशी समाजाचे अध्यक्ष चंदू परदेशी, अविनाश जाधव, प्रा.अनिल पवार, प्रा.अनिल वाल्हे सतिश पवार, डॉ.योगेश महाले, लक्ष्मण परदेशी, राकेश परदेशी, जगतराव निकुंंभ आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
रक्तदात्यांना अमळनेर युवा परिट धोबी मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबांची प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमास गंगाराम वाल्हे, किशोर महाले, अनिल वाघ, गणेश नेरकर, भरत जावदेकर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिपक वाल्हे यांनी तर आभार मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद जाधव यांनी केले.




