अमळनेर:- तालुक्यातील जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मंगरूळ गावात रक्त नमुने संकलन करून हत्तीरोग संक्रमण पडताळणी करण्यात आली.
राष्ट्रीय किटकजन्य रोग निंयत्रण कार्यक्रमांर्तगत सह संचालयक आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग, व जलजन्य रोग) पुणे यांच्या परीपत्रकानुसार केंद्र शासन आदेशान्वये “हत्तीरोग दुरीकरण मोहिम 2027” अंतर्गत मार्गदर्शक सुचनानुसार पोस्ट व्हॅलिडेशन सर्व्हेलन्स करीता अमळनेर तालुकयातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जानवे अंतर्गत मंगरूळ गावाची निवड करण्यात आली.मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांच्या आदेशान्वये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी ,वैदयकीय अधिकारी डॉ. संजय रनालकर डॉ.हेमंत कदम तालुका पर्यवेक्षक प्रशांत फुगे, किशोर माळी यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 18 व 19 रोजी रात्री 10.00 ते 12.00 वाजेच्या दरम्यान मंगरूळ गांवात प्राथमिक आरोग्य केंद्र जानवे येथील आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका, मदतनीस आरोग्य पथका व्दारे रात्र रक्त नमुना संकलन पडताळणी करण्यात आली.
एकंदरीत गावाची लोकसंख्या पाहता गावात तीन भाग करण्यात आले व तिन पथकांव्दारे रात्री दहा वाजेपासून ते बारा वाजेपर्यत रात्र रक्त नमुणे संकलन करण्यात आले. आरोग्य सेवक सि एम पाटील, एकनाथ पाटील , आर एम पाटील, योगेश गावीत, अनिल पाटील , शुभम साळुंके , आशा स्वयंसेविका, मदतनीस यांनी घरोघरी जाऊन भेट देऊन मोठया प्रमाणत किटक जन्य आजार व इतर आजारांबाबत जनजागृती केली व गावातील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, आदींनी सहकार्य केले.