
सोशल मीडियावर मेसेज झाला व्हायरल, शहरात रंगली चर्चा…
अमळनेर:- शहरातील दोन डॉक्टरांमध्ये व्यावसायिक स्पर्धेतून चांगलाच वाद रंगला असून एकाने दुसऱ्याला केलेला मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने शहरात याची चर्चा रंगली आहे.

शहरात डॉक्टरांची संख्या वाढल्याने निकोप (?) स्पर्धा होत असताना त्याच्यात थेट रुग्ण पळवले जात असल्याने त्यांचा वाद रंगला असून एकमेकांना केलेले मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने शहरात याची चर्चा रंगली आहे. विविध आमिष दाखवून माझे काँटॅक्ट व रुग्ण पळवतो असा आरोप करत एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरवर आरोप करत त्याच्या पत्नीला मेसेज केले. हा वाद पुरुष आणि महिला डॉक्टरांमध्ये असल्याचे या मेसेजवरून स्पष्ट होते. महिला डॉक्टरांनी पुरुष डॉक्टरांच्या पत्नीला थेट मेसेज करत म्हटले आहे की, तुमच्या हजबंडला सांगा लेडीज शी काय कॉम्पिटिशन करतो म्हणा. एक मर्दा सारखी प्रॅक्टिस कर. मी जिथे जाते तिथे त्याला घुसायची गरज नाहीये. मला घाबरतो म्हणून माझ्या प्रॅक्टिस मध्ये येत आहे. ‘ते’ सर बरे तुमच्यासारखे पाठीत सुरा तर खूपसत नाही.
मात्र सोशल मीडियावर चुकून अथवा जाणूनबुजून ह्या मेसेजचा स्क्रीनशॉट व्हायरल करण्यात आला. त्यानंतर ह्या दोन्ही डॉक्टरांच्या वादाची चर्चा शहरभरात रंगली असून त्याला काही आर्थिक वादाची किनार आहे काय याचा मात्र नक्की शोध लागणार आहे. तर यात रुग्ण भरडला जाऊ नये, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.




