
अमळनेर:- तालुक्यातील हिंगोणे बु. येथील ४५ वर्षीय इसमाचा बोरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना ११ रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ११ रोजी सायंकाळी ६:३० वाजता हिंगोणे बु. येथील अरुण शंभू पाटील (वय ४५) हा पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाल्याने गावातील ग्रामस्थ त्याचा शोध घेण्यासाठी गेले असता हिंगोणे बु. गावापासून अर्धा किमी अंतरावर अरुण हा नदीपात्रात बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्यास ग्रामस्थांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. चेतनसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.




