
अमळनेर:- शहरातील अष्टविनायक मित्र मंडळ, अयोध्या नगर यांनी नेहमी प्रमाणे ह्या वर्षीही गणेशोस्तव साजरा करत आहे.

ह्या वर्षी पुणे येथील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांची प्रतिकृती स्थापन केली असून भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे, अष्टविनायक मित्र मंडळ यांनी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले होते, त्यात लहान मुलं महिला, पुरुष वर्ग खूप मोठ्या संख्येने सहभागी होत असतात व स्पर्धेचा आनंद घेतात. यावेळी स्थानिक रहिवाशी यांच्याकरिता 2 दिवसा साठी मोफत शिबिराचे आयोजन केले होते त्यात 12 तारखेला जनरल चेकअप, रक्तदाब (बीपी ) नाडी तपासणी सर्दी ,ताप, खोकला, एलर्जी, डोकेदुखी , अंगदुखी , व इत्यादी चेकअप करण्यात आले त्यात डॉ. योगिता अशोक शिंदे व रक्तगट तपासणी व शुगर तपासणी साठी श्रुती किरण शिंदे यांचे योगदान लाभले. 13 तारखेला दंत तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन केले होते त्यात डेंटल सर्जन डॉ. रविकिरण पाटील यांनी दातांची तपासणी केली, त्यात किडलेली दाढ, नवीन दात लावणे, सिमेंट भरणे, कॅप बसवणे सर्व प्रकारचे मार्गदर्शन व उपचार केले. अष्टविनायक मित्र मंडळाने घेतलेले सांस्कृतिक कार्यक्रम व ह्या वर्षीचे श्रीमंत दगडूशेट गणपतीची आरास हे अमळनेरांसाठी वेगळे आकर्षण ठरत आहे.




