शाकाहार,निसर्ग चित्र व आदर्श व्यक्ती विषयवार विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे
अमळनेर:- येथील रोटरी क्लब विविध स्पर्धा व समाजसेवी उपक्रम राबवत असते. यावर्षी 2024-25 या शैक्षणिक वर्षात शाळा जोमाने सुरू झाल्या व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांना सामोरे जावे यासाठी रोटरी क्लब अमळनेर यांनी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत अमळनेर शहरातील पीबीए इंग्लिश मिडीयम, ग्लोबल व्ह्यू इंग्लिश मिडीयम,श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळा , स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल , सी.आर. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, नॅशनल उर्दू हायस्कूल ,पर्ल इंग्लिश मीडियम स्कूल, अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल, सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे दोनशे पन्नास विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.स्पर्धा 4 गटात घेण्यात आली. तिसरी व चौथी एक गट, पाचवी व सहावी दुसरा गट, सातवी व आठवी तिसरा गट, नववी व दहावी चौथा गट. चार गट मिळून स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला . चित्र स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी शाकाहार,निसर्ग चित्र, गणपती,विविध आदर्श व्यक्ती या विषयावर चित्र काढली व रंगवली. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पट्टी, बिस्किट व चॉकलेट देण्यात आले. दोन तास चाललेल्या या चित्र स्पर्धेत दिनेश पालवे, दिलीप पाटील ,अशोक पाटील, हर्षा सपकाळे यांनी सर्व स्पर्धेची जबाबदारी सांभाळली.चित्र स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब प्रेसिडेंट ताहा बुकवाला , सेक्रेटरी विशाल शर्मा , प्रोजेक्ट चेअरमन डॉ. शरद बाविस्कर, प्रोजेक्ट चेअरमन देवांग शाह , सदस्य डॉ. राहुल मुठे ,रोहित सिंघवी, प्रा.दिलीप भावसार, विजय पाटिल , कीर्ति कोठारी, विजय माहेश्वरी , सुहास राने , अभिजीत भंडारकर , दिनेश रेज़ा या सर्वांनी सहकार्य केले. चित्र स्पर्धेचा निकाल 22 सप्टेंबरला लागणार आहे. तो आपल्या शाळेत कळविला जाईल असे पत्रकान्वये रोटरी क्लब ने कळविले आहे.