
कंपनीने अधिकाऱ्यांसमवेत केला पंचनामा, नुकसान भरपाई देण्याची प्रा सुभाष पाटील यांची मागणी…
अमळनेर : बोगस बियाण्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने सातत्याने कोरड्या ,ओल्या दुष्काळानंतर शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. नुकताच संयुक्तिक पंचनामा करण्यात आला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील यांनी केली आहे.
तालुक्यातील कलाली, दोधवद , हिंगोणे, निंभोरा , गावातील शेतकऱ्यांनी टाटा इशा कंपनीचे कापूस वाण लावले होते. पीक चार महिन्याचे झाले तरी एकही रोपाला कैरी , फुल फुगळी लागलेली नाही. शेतकऱ्यांनी वेळोवेळी कंपनी प्रतिनिधीला फोन लावून कळवले आहे. फवारणी केली ,खाते लावले , शेंडा खुडला तरी देखील काहीच लागलेले नाही. इतर कापूस वाणांना मात्र कैऱ्या लागल्या आहेत. ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रा सुभाष पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार शेतकरी महेंद्र ठाकरे , राकेश पाटील , पप्पू पाटील , प्रमोद दगाजीराव , राहुल भागवत , प्रवीण भागवत , नरेंद्र बाबुराव , सुभाष यांच्या नुकसान झालेल्या शेतात पंचनामे करण्यात आले आहेत. यावेळी शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार , कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी , कृषी सहाय्यक योगिता लांडगे , कंपनी प्रतिनिधी कृष्णा सुकासे हजर होते.




