
अमळनेर:- केस मोडायची असेल तर आम्ही सांगू तसे कर असे म्हणत दोघांनी एका महिलेला अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केल्याची घटना न्यायालयाच्या आवारात १८ रोजी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली.

एक सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तिच्या दिव्यांग प्रमाणपत्र बाबत सुरू असलेल्या खटल्यासाठी न्यायालयात गेली असता दुपारी सव्वा चार वाजता ती आपल्या दुचाकीजवळ आली असता योगेश मोहन पवार (रा पैलाड) आणि भरत माधव मोरे (रा कोळपिंप्री ता पारोळा) यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ करत केस मोडायची असेल तर आम्ही सांगू तसे करावे लागेल असा दम देत तिचा विनयभंग केला. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.




