
अमळनेर:आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त राज्यातील 434 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थासह तांत्रिक विद्यालयांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण देशाचे उपराष्ट्रपती जगदीपजी धनखड यांच्या शुभहस्ते आभासी पद्धतीने मुंबई येथे संपन्न झाला.
मंगलप्रभात लोढा ,कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या संकल्पनेतून संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली. आयटीआय अमळनेर येथे संविधान मंदिर लोकार्पण सोहळा राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सोहळ्याचे सूत्रसंचालन संस्थेचे सागर पाटील व प्रास्ताविक प्रमोद पवार यांनी केले.
मंत्री अनिल पाटील यांनी आपल्या भाषणात संविधानाचे महत्त्व सांगितले. आपण भारतीय नागरिक म्हणून आपले मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य व राज्यकर्त्यांनी शासन कसे चालवावे यासाठी मार्गदर्शक तत्वांचेही महत्त्व पटवून दिले व प्रशिक्षणार्थ्यांनी संविधानाबाबत जागृत राहण्याचा सल्ला दिला. आय.टी.आय. मध्ये नव्याने व्यवसाय सुरू करावेत जेणेकरून तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्यातच प्रशिक्षण मिळेल अशी भावना व्यक्त केली. त्याचबरोबर संस्थेच्या परिसरातील वृक्षारोपणासह स्वच्छतेचे ही कौतुक केले.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश विक्रम पाटील, व विधानसभा क्षेत्र प्रमुख एल. टी. पाटील, सौरभ विश्वेश्वर उपासनी, सहाय्यक संशोधन अधिकारी, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे प्राचार्य अनिल देव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे जेष्ठ शिल्पनिदेशकव्ही. पी. वाणी,के. व्ही. बिऱ्हाडे,ए .डब्ल्यू. दुसाने, एस. एस. इंगळे ,नम्रता निकम, सचिन महाजन, सागर पाटील, साईप्रसाद, डी एम. गोसावी, रोहिणी मासरे, ज्योती दुबे, कैलास माळी, प्रमोद पवार, डी एस पाटील, मनोज चव्हाण, चेतन जावडेकर व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन व्ही.पी. वाणी यांनी केले आणि उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




