
अमळनेर:- येथील जायन्ट्स सप्ताह अंतर्गत दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी भगिनी मंडळ प्राथमिक शाळा अमळनेर येथे जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेलीतर्फे 4 थी ते 7 वीच्या विद्यार्थीना गुड टच बॅड टच विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
ऍड.तिल्लोतमाताई पाटील यांनी मुलां-मुलींना मार्गदर्शन करताना सध्या घडत असलेल्या घृणास्पद गोष्टी, मुला-मुलींवर होत असलेले अत्याचार का वाढत आहेत आणि त्याला कसं थांबवू शकतो याविषयी चर्चा केली.तसेच अडचणीत सापडल्यावर प्रसंगावधान साधून घातक ठिकाणून पळ काढा, जवळपास मदत मागत 1098 या नंबर वर संपर्क साधा, मदत मागा असे आवाहन केले. ग्रुपच्या अध्यक्ष दिपीका सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांशी चर्चा केली. व्यक्त व्हा,घरातील सुरक्षित वाटणारे नाते जसे आई-वडील, आजी-आजोबा तसेच शिक्षकांना आपल्या अडचणी सांगा.अनोळखी ठिकाणी थांबू नका. अनोळखी लोकांकडून मोहाला बळी पडून काही घेत ओळख वाढवू नका असा सल्ला देण्यात आला. यावेळी सचिव शोभा पाटील, उपाध्यक्ष रुपाली पाटील, निलीमा सोनकूचरे तसेच भगिनी मंडळ शाळेच्या मुख्याध्यपिका मंगला सोनवणे व जेष्ठ शिक्षिका विजया गायकवाड व संपूर्ण शिक्षक वर्ग उपस्थित होते.




