
सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन…
अमळनेर:- तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने पैलाड चोपडा नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
धनगर जमातीला एसटी आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूर, लातूर, नेवासा फाटा व पुणे येथे धनगर बांधव उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रभर ठिकठिकाणी धनगर बांधव उपोषण करीत आहेत त्यांना पाठिंबा म्हणून अमळनेर तालुका सकल धनगर समाज बांधव शेळ्यामंडळ घेऊन मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले व रास्ता रोको आंदोलन केले. शेळ्या मेंढ्यांमुळे व मोठ्या संख्येने आंदोलन रस्त्यावर उतरल्यामुळे रस्ता व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनाने यावेळेस शर्तीचे प्रयत्न करावे लागले. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे साहेब यांनी आंदोलकांची संवाद साधत म्हणणे मांडले व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आपल्या संपूर्ण मागण्या मी प्रशासनाकडे पाठवतो असे आश्वासन दिले. यावेळी बहुसंख्येने उपस्थित असलेल्या धनगर जमात बांधवांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. वसुंधरा लांडगे, डी ए धनगर प्रा. लक्ष्मण निळे, सेवानिवृत्त पीआय हिरामण कंखरे, चेतन देवरे यांनी आंदोलनाची भूमिका मांडली.
यावेळी मच्छिंद्र लांडगे नितीन निळे , समाधान धनगर, जिभाऊ कंखरे, गोविंदा कंखरे, सुधाकर पवार, विलास लांडगे, शिरसाठ, धनराज कंखरे, दिलीप शिरसाट, संजय शिरसाट, पंडित लांडगे, राजू मोरे, दीपक लांडगे, पिंटू लांडगे, प्रताप कंखरे, बापू मिस्तरी, संतोष लांडगे, तुषार इथे, शशिकांत लांडगे, रमेश बिर्हाडे, वसंत बिऱ्हाडे, नाना शिरसाट, समाधान लांडगे, सतीश धोंडू, भिका लांडगे, मुरलीधर मोरे, शशिकांत आढावे, प्रीतम रत्नपारखी, उमेश मनोरे, आदी समाजबांधव उपस्थित होते.




