
अमळनेर : पूज्य सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पतपेढीचे अध्यक्ष सुशील भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी सभासदाच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. सभासदाना पुढील वर्षापासून वाढीव मिटिंग भत्ता ६०० रुपये , संस्थेत प्रथमपासून तर सेवानिवृत्त होईपर्यंत सभासद राहणाऱ्या सभासदांच्या निवृत्त सत्कार रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच सभासदांना कर्ज वर्गणी व इतर व्यवहाराचा पारदर्शीपणा म्हणून मोबाईल वर संदेश पाठवण्यात येणार आहेत.
तसेच यावेळी सेवानिवृत्त सभासद आणि दहावी, बारावी, पदवी ,पदव्युत्तर गुणवंत सभासद पाल्यांचा व विशेष प्राविण्य मिळणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष सुशील भदाणे, माजी अध्यक्ष रमेश चव्हाण, महेश नेरपगारे, संजीव पाटील, प्रा मंदाकिनी भामरे, सविता बोरसे , प्रतिभा जाधव , आशिष शिंदे ,सचिन साळुंखे , राजेंद्र पाटील, प्रमोद पाटील, माध्यमिक पतपेढीचे संचालक तुषार बोरसे ,राजेंद्र पाटील , के यु बागुल , डी ए धनगर , जितेंद्र ठाकूर , महेंद्र रामोसे , सुनील पाटील ,व्ही सी पाटील, कुंदन पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.
अहवाल वाचन व्यवस्थापक सागर पाटील यांनी सूत्रसंचालन संजय पाटील व आभार सविता बोरसे यांनी मानले.




