
शेतकरी नेत्यांनी तहसीलदार व सहायक निबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला इशारा…
अमळनेर : मक्याला व कापसाला लवकरात लवकर हमी भाव द्या, खरेदी केंद्र सुरू करा. बाजार समितीत आर्द्रता मोजून प्रतवारी करा अन्यथा बाजार समिती बंद पाडू असा इशारा देत शेतकरी नेत्यांनी तहसीलदार व सहायक निबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरात मका व कापूस येण्यास सुरुवात झालेली आहे. तरी आज शेतकऱ्यांना मक्याला शासनाचा हमीभाव 2250 ₹ असून शेतकऱ्याच्या माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चौदाशे ते पंधराशे भावाने खरेदी होत आहे. आज व्यापारी म्हणतात मका ओला आहे परंतु शेतकऱ्यांच्या मका मार्केट कमिटीचे आर्द्रता मशीन लावून चेक करून त्याप्रमाणे भाव शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी शेतकरी बंधू करत आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंची ही पण एक मागणी आहे की पणन महासंघाने लवकरात लवकर शासनाची मका खरेदी सुरू करण्यात यावी. कारण की अमळनेर तालुक्यामध्ये मकाचे मोठ्या प्रमाणे पीक आहे त्यामुळे लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांमार्फत होत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी अमळनेर तालुक्यातून प्रा सुभाष पाटील(किसान काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष ) ,शिवाजी दौलत पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य) विजय काशिनाथ पाटील (माजी शिवसेना तालुकाप्रमुख) यांनी आज तहसीलदार व सहाय्यक निबंधक यांच्याकडे निवेदन दिले आहे.
निवेदनावर विजय पाटील,भरत पाटील, मधुकर पाटील , शिवाजी दौलत पाटील, श्रीकांत पाटील, सुनील पाटील, राजेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, गोकुळ पाटील, तुळशीराम पाटील, जयपाल गिरासे ,शिवाजी पाटील , विकास पाटील,बन्सीलाल पाटील , जितेंद्र शिंदे ,विजय पाटील, सुरेश पाटील ,श्रीराम पाटील, भालेराव पाटील, सुखदेव गव्हाणे, जगदीश पाटील, सुनील पाटील आदींच्या सह्या आहेत.




