
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे घरासमोर लावलेली मोटारसायकल रात्रीतून चोरीला गेल्याची घटना २५ रोजी उघडकीस आली आहे.
मांडळ येथील जालिंधर जगन्नाथ बुवा (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची २० हजार रुपये किमतीची हिरो होंडा सीडी डिलक्स कंपनीची एमएच १९ एक्यू ०७०३ क्रमांकाची दुचाकी २४ रोजी रात्री ११ वाजता घरासमोर लावली होती. २५ रोजी सकाळी उठून बाहेर पाहिले असता दुचाकी दिसून नसल्याने आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र कोणताही तपास लागला नाही. त्यामुळे मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.




