अमळनेर:- तालुक्यातील मंगरूळ येथील सेंट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, जळगांव येथे पार पडलेल्या १४ वर्षा खालील मुलींच्या बास्केट बॉल स्पर्धेत सेंट मेरी शाळेच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना कमलेश मोरे, किरण शिंपी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोईस, मॅनेजर मदर डिव्हाइन व प्रशिक्षक यांच्यासह सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.
Related Stories
December 22, 2024