
अमळनेर:- तालुक्यातील म्हसले येथून घराजवळील गोठ्याच्या अंगणातून दोन गुरे चोरीस गेल्याची घटना २६ रोजी रात्री ते २७ रोजी सकाळ दरम्यान घडली.
गोकुळ काशिनाथ पाटील रा म्हसले यांच्या घराजवळील गोठ्याच्या अंगणात नेहमी गुरे बांधली जात होती. २७ रोजी सकाळी सहा वाजता गोकुळ पाटील गाईचे दूध काढण्यासाठी गेले असता त्याठिकाणी सुमारे १२ हजार रुपये किमतीची दोन गोरे त्यांना आढळून आली नाहीत. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.




