
अमळनेर:- शहरात चोरट्यानी हातसफाई व जबरदस्ती करत एका वृद्धेची सोन्याची पोत आणि एकीचे दहा हजार रुपये लांबवल्याच्या घटना ३० रोजी घडल्या.
टाकरखेडा येथे माहेरी राहणारी ७५ वर्षीय कमलबाई यशवंत पाटील ही शासनाच्या निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी हयातीचा दाखला देण्यासाठी आली होती. एक म्हातारा आणि एक तरुण दोघे जण तिच्या कडे आले आणि तिला बोलण्यात फसवले की तू पूजा करून घे तुझे चांगले होऊन जाईल. म्हातारी नाही म्हणत असताना त्यांनी जबरदस्ती केली. हातातील कागद घेऊन त्यांनी तिला गळ्यातील मंगळसूत्र काढून कागदाच्या पुडीत ठेवले. व ते तिला जपून ठेवायला सांगत असताना हातचलाखी करून मंगळसूत्र गायब केले. थोड्या वेळात म्हातारी भानावर येताच तिला मंगळसूत्र गायब झाल्याचे कळले.
तर दुसऱ्या घटनेत ताडेपुरा भीमनागर भागातील सुमनबाई धाकू बैसाणे वय ६५ ही महिला ११ वाजेच्या सुमारास स्टेट बँकेत पेन्शन घेण्यासाठी आली. पेन्शन घेतल्यानन्तर महिला राजस्थान स्वीट मार्ट मध्ये आली असता एक जण आला आणि त्याने महिलेला काहीतरी सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला व पैसे मागितले. महिला १०० रुपये देत असताना त्यांनी संपूर्ण १० हजार रुपये हिसकावून नेले. नागरिकांनी पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे ,गणेश पाटील यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी आजूबाजूला कॅमेरे तपासले. त्यात महाराणा प्रताप चौकात घटना घडली तिकडील दोन कॅमेरे बंद आढळून आले. पोलीस इतरही ठिकाणी चौकशी करून गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.




