अमळनेर-,येथील नगरपरिषदेतून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांची चोपडा नगरपरिषदेत बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर नगरपरिषदेचे श्रेणी १ चे अधिकारी रवींद्र चव्हाण यांची दि. ३० पासून मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी नेमणूक केली आहे.
सदर उपमुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.