
अमळनेर:- येथील मराठी वाड्मय मंडळ तसेच प्रा र का केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय तर्फे नवरात्रोत्सव काळात 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान शारदीय व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले.
3 ऑक्टोबर रोजी डॉ उदय निरगुडकर यांचे भारत काल आज आणि,4 रोजी ॲड आशिष जाधवर यांचे भारतीय संविधान,5 रोजी रोजी शाहीर शिवाजीराव पाटील रंग शाहिरी कलेचा,6 रोजी डॉ संजय कळमकर जगण्याच्या वाटा,7 रोजी प्रवीण दवणे दीपस्तंभ मनातले जनातले या विषयांवर शारदीय व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यान माला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे दररोज सायंकाळी 6.30 वाजता राहील




