अमळनेर:- टाकरखेडा रेल्वे मार्गांवरील कुऱ्हे गावाजवळ असलेल्या अंडर बायपास बोगद्यातील खड्डा बुजवून तेथील पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करा अशी मागणी निवेदनातून अभिषेक पाटील यांनी केली असून याबाबत निवेदन त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहे
सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील अमळनेर ते टाकरखेडा या दरम्यान असलेल्या कुऱ्हे गावाजवळील अंडर बायपास बोगद्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रासास सामोरे जावे लागत आहे. त्यातच अमळनेर कडून जातांना बोगद्याच्या मधोमध सुमारे दोन फुटाचा मोठा खड्डा आहे. त्याचा अंदाज येत नसल्याने चालकाची मोठी तारांबळ उडते. अनेकदा येथे दुचाकी घसरून अपघात घडले आहेत बोगद्यातील या खड्ड्याची दुरुस्ती तात्काळ करावी व पाण्याचा निचरा लवकरात लवकर होईल अशा प्रकारची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.