
अमळनेर:- शहरातील शिरुड नाका व शिवाजी नगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शिरूड नाका भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून झुंडीने २०-२५ कुत्रे फिरत असतात. लहान मुले अंगणात खेळत असताना त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्री अपरात्री नागरिक काठ्या घेवून कुत्री हाकलत फिरत असतात. त्यामुळे नगरपरिषदेने या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.

