अमळनेर : विभागाचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांची अचानक मुदतपूर्व बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महादेव खेडकर यांची धुळे उपजिल्हाधिकारी (रोहयो) येथे बदली झाली. त्यांच्या जागी धुळे येथील रोहयो उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांची नियुक्ती झाली आहे. महादेव खेडकर यांनी निवडणूक काळात अतिशय उत्कृष्ट काम केले होते. तसेच कागदपत्रे पूर्ण असलेला एकही जातीचा दाखला प्रलंबित राहू दिलेला नव्हता. प्रलंबित कामांचा त्वरित निपटारा केला होता. तरी देखील अवघ्या सव्वा वर्षात त्यांची बदली होते याबद्दल सर्वसामान्य जनता आश्चर्यचकित झाली आहे. शासनाचे महसूल विभागाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी १ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे.