
अमळनेर:- पांझरा नदीत सहा मजूरानसह व बैल गाडीत पाण्याच्या प्रवाहात पलटी झाल्याने पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
लगतच्या शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील शेतकऱ्यांची 75 टक्के जमीन ही अमळनेर तालुक्यातील तांदळी शिवारात आहे त्यामुळे पढावद येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामे करण्यासाठी रोज पांझरा नदीत जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत असते. पांझरा नदीत पढावद येथे पूल नसल्यामुळे अशीच घटना 3 आक्टोंबर रोजी घडली पढावद येथिल प्रगतशील शेतकरी व सरपंच रवींद्र पवार यांची बैलगाडी मजूर घेऊन नदीच्या प्रवाहातून शेतात कामासाठी जात असताना अचानक नदीला जास्त प्रवाह आल्यामुळे व पाण्याच्या अंदाज व्यवस्थित न समजल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे बैलगाडी पलटी झाली व जास्त पाण्यात बैलगाडी शेतमजूर वाहू लागले मजुरांनी आरडाओरडा केल्याने गावकऱ्यांसमोरच बैलगाडी पाण्यात वाहून जात असल्याने सर्व गावकरी मदतीसाठी धावले गावा जवळच शेजारी असल्याने पढावद येथील पोलीस पाटील ईश्वर पवार व गावकरी यांनी मदतीला धाव घेत मजूर तसेच शेतमालकाच्या बैल गाडी काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे बैलगाडी व मजूर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले कुठलीही जीवित हानी घडली नाही. गावकरी व पोलीस पाटील ईश्वर पवार यांनी सदर मजूर व बैलगाडी पाण्यातून बाहेर काढून सुटकेचा नवी निःश्वास सोडला मात्र दरवर्षी पावसाळ्यात दोन-तीन घटना वारंवार घडत असतात यासाठी लोकप्रतिनिधींनी दखल घेत नसल्याची खंत पढावद करांनी व्यक्त केली आहे. येथील शेतकरी तीस वर्षापासून पांझरा नदीवर पुलाची मागणी करत असून त्याबाबत वेळोवेळी निवेदन दिली आहेत. मात्र प्रशासन स्थानिक आमदार खासदार या गोष्टीकडे लक्ष देत नाही. मोठी जीवितहानी झाल्यास प्रशासन लक्ष घालेल का ? असा प्रश्न पढावद ग्रामस्थांनी केला आहे. सदर घटनेची माहिती पोलीस पाटील ईश्वर पवार यांनी प्रशासनास दिली असून पढावद येथील पोलीस पाटील ईश्वर पवार यांना पोहता येत नसताना दाखवलेल्या शौर्याबद्दल पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष भूषण बोरसे, राजेंद्र पाटील, नारायण गिरासे, दीपक माळी, महेंद्र पाटील, युवराज माळी, शिवाजी पाटील, मनोहर पाटील, चरणसिंग गिरासे, भैया नगराळे आदींनी कौतुक केले

