
अमळनेर:- उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या मुदतपूर्व बदलीला मॅट कोर्टाने जैसे थे चे आदेश दिले असून पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या कामाबाबत तक्रारी नसताना आणि त्यांचा दोन वर्षांचा प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना शासनाने त्यांची बदली धुळे येथे आणि धुळ्याचे नितीन मंडावरे यांची अमळनेर येथे केली होती. या बदलीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त करून आश्चर्यही व्यक्त केले होते. या निर्णयाविरुद्ध महादेव खेडकर यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती. तर खेडकर याना स्थगिती मिळू नये म्हणून कॅव्हेट दाखल करण्यात आले होते. खेडकर यांच्यातर्फे ऍड एस आर बारलिंगे , डी एम हंगे , व कॅव्हेटर कडून चेतन चौधरी यांनी युक्तिवाद केला. यात खेडकर याना अवघे १ वर्ष ४ महिने झाले आहेत तसेच मंडावरे यांनाही कार्यमुक्त केलेले नव्हते. या मुद्य्यांवर चर्चा झाली. न्या व्ही के जाधव यांनी या निर्णयाला जैसे थे चे आदेश दिले असून पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे.