
अमळनेर:- दि. 29 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतलेला होता त्यामध्ये सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूल, मंगरूळ तालुका अमळनेरच्या 17 वर्षाआतील मुली या गटातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले व प्रथम क्रमांक मिळवला. जान्हवी भामरे, श्रेयसी सोये, यज्ञा पाटील, मेघना मराठे, मानसी पाटील, प्रांजली सोनवणे, नेहा वाल्हे, निकिता काकुलीत, जानवी पाटील, अपूर्वा पाटील, अनन्या पाटील, वैष्णवी पाटील ही विजयी खेळाडूंची नावे आहेत.या सर्व खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जॉईस, मॅनेजर मदर डिव्हाईन यांनी गुलाब पुष्प देऊन सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व त्यांना क्रीडाशिक्षक कमलेश मोरे, किरण शिंपी व कोच विक्की बैसाणे यांचे मार्गदर्शन लाभले.




