
अमळनेर:- अमळनेरसह परिसरात २०२४ या वर्षात अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने परीक्षा शुल्क माफ करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन काल प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण कोचर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्याम पाटील व पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी अक्षय चव्हाण , अनिरुध्द शिसोदे , राहुल बिऱ्हाडे , शुभम पवार , कल्पेश पाटील , यश हापसे , रोहित पाटील , उज्वल निकम , राहुल पाटील , तुषार पाटील , समीर शेख , समीर भिल, साहिल पाटील, वृषभ बैसाने, मयुरी पाटील, निकिता पाटील, भाग्यश्री पाटील प्रांजली शेलकर, मानसी पाटील, तृप्ती पाटील, आश्विनी पाटील, गायत्री पाटिल,अश्विनी पाटिल, हर्षदा निकम, सुमित मंडलिक यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.




