
सणासुदीत महावितरणचे अघोषित भारनियमन…
अमळनेर:- सध्या अमळनेर तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. मंगळवारी अंमळनेर तालुक्यात पारा ३८ अंशांवर पोहोचला होता. एकीकडे तापमानात वाढ होत असताना, दुसरीकडे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणदेखील ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यामुळे अंमळनेर तालूक्यातील जनता उकाड्याने बेहाल झाले आहेत, त्यात हि एन सणासुदीला नवरात्री चालू असताना अघोषित लोडशेडींग, त्यात बहुतेक वीज उपकेंद्रात रिले जळणे, इन्शुलेटर फुटणे,ह्या घटनेत वाढ झाल्याने नादुरुस्त ट्रान्सफार्मर, ट्रीकटिंग आदींच्या नावाने भर दुपारी व रात्री बेरात्री वीज पुरवठा खंडित करून महावितरण कंपनी नागरिकांना होणाऱ्या उकड्यात भर घालते आहे.
अमळनेर तालुक्यातील जनेतेला ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू असल्याने काही दिवसांतच मान्सून तालुक्यासह जिल्ह्यातुन परतण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार अमळनेर तालुक्यातील पारा दिनांक 8 रोजी 38 अंशांवर पोहचला होता, त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचीं लाही लाही होताना दिसत आहे, त्यात महिला मुलाबाळांना व वृद्ध तसेच रुग्ण असलेल्या नागरिकांना जीव जाईल असे वातावरण सध्या निर्माण झाले, त्यातून महावितरण कंपनी अवेळी रात्री बेरात्री सणासुदीला अघोषित लोडशेडींग करून सर्व सामान्य नागरिकांच्या उकाड्यात भर घालत आहे. कळमसरे उपकेंद्रात रिले जळणे, इन्शुलेटर फुटणे,ह्या घटनेत वाढ झाल्याने नादुरुस्त ट्रान्सफार्मर, ट्रीकटिंग आदींच्या नावाने वीज पुरवठा खण्डीत होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचीं लाही लाही होत आहे.
उन्हाची तीव्रता व उकाडा होण्याची सुरुवात महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच झाली असून, अमळनेरचा पारा 38 अंशांवर पोहोचला आहे . पहिल्याच आठवड्यात जर जबरदस्त उकाड्याने नागरिक बेहाल झाले असतील तर अजून महिनाभरात ‘ऑक्टोबर हीट’ अधिक जाणवणार असून, पहाटेचा गारवा कमी राहण्याची शक्यता आहे.
राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज…
7 ते 11 ऑक्टोंबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील विजांच्या कडकटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यंदा अंमळनेर तालुक्यात १२६ टक्के पाऊस झाला आहे. तर या ऑक्टोंबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.




