
अमळनेर:-तालुक्यातील प्राचीन पेशवेकालीन असलेल्या आराध्य दैवत कुलस्वामिनी आई महालक्ष्मी आणि माता एकवीरा देवीच्या दर्शनाला भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी उसळते आहे.
मंदिर विद्युत दिव्यांच्या रोषनाईने सजविण्यात आले असून विजया दशमीपर्यंत येथे मोठ्या संख्येत भाविकांची गर्दी सुरू राहणार आहे. त्यानिमित्त मंदिर गावकऱ्यांनी मंदिर सजावट केले आहे.भव्य असे पूर्ण कोरीव दगडात मंदिर असून घुमट सुद्धा दगडी आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असून दगडाने मंदिरात अत्यंत गारवा असतो. ऐश्वर्य व भरभराटीची देवी महालक्ष्मी देवीचे मनोभावे पूजन केले जाते. शासकीय गॅझेट मध्ये सुद्धा या मंदिराची नोंद आहे. राजवाडे संशोधन मंडळ धुळे येथेही या मंदिराच्या इतिहासाची नोंद आहे.
होम हवन होणार येथील महालक्ष्मी मंदिरात अष्टमीला होम हवन करण्यात येते. याठिकाणी अश्विन नवरात्रोत्सवात कुसुंबा, मोराणे, पुणे, मध्यप्रदेश, गुजराथ भागातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात स्वयंभू असलेली देवी म्हणून आख्यायिका आहे.
अश्विन शुद्ध अष्टमी ,दिनांक ११ ऑक्टोंबर २०२४ शुक्रवार रोजी आहे. या दिवशी अष्टमी ही तिथी दुपारी १२ वा ०६ मिनिटांपर्यंत असून नंतर नवमी तिथी सुरू होत आहे. त्यामुळे अष्टमी व नवमी चा उपवास याच दिवशी करावा असे दाते पंचांगात दिलेले आहे. तसेच होम हवन या दिवशी करावे. नवरात्रीत कन्या पूजनही करतात, कन्येला देवीचे स्वरूप मानून तिचे पूजन करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. नवरात्र उत्सवात करण्यात येत असलेल्या होम हवन कार्यासाठी अष्टमी व नवमी या दोन्ही तिथी शुभ मानल्या गेलेल्या आहेत त्यामुळे या दिवशी हवन वगैरे कार्य करण्यास हरकत नाही असे पुरोहित शैलेश काळकर यांनी सांगितले आहे.




