
नवरात्र उत्सवात न्यू प्लॉट विकास मंचचा उपक्रम
अमळनेर -येथील समुपदेशक कलाकार आर बी पाटील तथा कोकाकोला सरांच्या “सुलटी फिटिंग”कार्यक्रमाने नवरात्रोत्सवात भाविकांची मने जिंकली.
नवरात्र उत्सवात न्यू प्लॉट विकास परिसर मंचच्या वतीने हा प्रबोधनात्मक तथा विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.अमळनेर येथील रहिवासी असलेले आर बी पाटील सर हे गेल्या वर्षापासून विविध शाळा,कॉलेज तसेच गावोगावी फिरून आपल्या कलेच्या माध्यमातून विद्यार्थी,महिला व पुरुष आणि शेतकरी बांधवांना प्रबोधनाचे कार्य करीत आहेत,यात त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा पाटील यांची देखील कोकाकोला मॅडम म्हणून त्यांना साथ लाभत आहे.न्यू प्लॉट भागात छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात रात्री हा कार्यक्रम आयोजित केला होता.आपल्या एक तासांच्या कार्यक्रमात त्यांनी कोकाकोला म्हणजे तीन क ची उत्तम प्रकारे फोड करून मुले,महिला आणि पुरुषांचे प्रबोधन केले.विनोदी शैलीमुळे अधून मधून हास्याचे फवारे आणि सुरेल गीतांमधून त्यांनी प्रचंड दाद मिळवली.सर्वांनी त्यांचे टाळ्यांनी कौतुक केले.
विनामूल्य कार्यक्रम घेऊन उत्तम प्रबोधन केल्या बद्दल त्यांचा मंच तर्फे सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन संजय चौधरी तर आभार मंच् चे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी नवरात्र मंडळाचे अध्यक्ष रोहन आठवले,कार्याध्यक्ष सौरभ जैन,महेंद्र पाटील व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.




