अमळनेर : उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने हतनूर ,तामसवाडी आणि अक्कलपाडा धरण पूर्ण भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
पांझरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून १० हजार ४४३ क्यूसेस विसर्ग सोडण्यात आला आहे. पांझरा नदी काठावरील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन धुळे मध्यम प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता यांनी केले आहे. मांडळ येथील पुलाला पाणी पोहचण्याच्या मार्गावर आहे. विसर्ग जर वाढवण्यात आला तर पुलावरून पाणी जाऊ शकते.
त्याचप्रमाणे बोरी प्रकल्पातून ५ हजार ४१८क्यूसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणावरील वक्रद्वार २ ,४ ,६ ,९ ,१२ व १५ हे ३० सेमी ने उघडण्यात आले आहेत. बोरी नदीवरील सर्व बंधारे ओसंडून वाहू लागले असल्याने आजूबाजूच्या परिसरातील विहिरीची पाण्याची पातळी वाढणार आहे.