उपाययोजनांसह कर्जमाफी द्या,माजी आमदार कृषिभूषण पाटील यांची मागणी
अमळनेर -,अमळनेर व पारोळा तालुक्यात खरीप हंगामासाठी ओला दुष्काळ दुष्काळ जाहीर करून उपाययोजनांसह कर्जमाफी द्यावी अशी मागणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री यांचेसह सर्व संबंधित मंत्री महोदयाकडे केली आहे.
यात म्हंटले आहे की “खरीप हंगाम – जून ते सप्टेंबर, २०२५ आणि १३ ऑक्टोबर, २०२४ अखेर अमळनेर तालुक्यात ९८४.२६ मि.ली. आणि पारोळा तालुक्यात ७५७.०० मि.ली. म्हणजेच सरासरीपेक्षा अधिक सततचा पाऊस, विजांचा कडकडाटसह वादळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कापसासह सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे “खरीप हंगाम – २०२४हातातून गेल्यामुळे शेतकरी पुन्हा हताश होवून दुहेरी संकटात सापडला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची शासनाप्रती असंतोषाची व नाराजीची भावना दूर करण्यासाठी “ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीसह तातडीने आर्थिक मदत करण्याच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी अशी विनंती त्यांनी दिलेल्या पत्रात केली आहे.
सदर निवेदन उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना अजितदादा पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील,कृषी मंत्री ना धनंजय शिंदे,मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल पाटील आदींना दिले आहे.