
अमळनेर:- आचारसंहिता लागू झाल्यापासून ३.३० वाजेपासून पालिका कर्मचारी यांनी आघाडी घेतली. याबरोबर शासकीय यंत्रणा कामाला लागली. पालिकेच्या माध्यमातून शहरातील राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर, झेंडे, विविध कामांच्या कोनशिला आदी काढणे अथवा झाकण्याची कार्यवाही सुरू झाली. पालिकेच्या पथकाने सायंकाळी आचारसंहिता लागली असून आघाडी घेतली आहे.
प्रत्येक प्रभागात १० ते १० कर्मचारी व एक मुकादम तैनात करण्यात आले आहेत. असे एकूण १७ प्रभागात काढत आहेत. तर विविध प्रभागात तर उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, किरण कंडारे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ, अग्निशमन दलाचे दिनेश बिऱ्हाडे, यांच्यासह अतिक्रमण पथक प्रमुख यांच्यासह अतिक्रमण पथक तैनात करण्यात आले होते. एका दिवसांत बॅनर, पोस्टर्समुळे गुदमरलेल्या शहराने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही कार्यवाही यापुढेही सुरू राहणार असल्याने किमान आचारसंहिता लागू असेपर्यंत हा मोकळा श्वास कायम राहणार आहे.
घरावर लावलेले झेंडे काढा.
घरावर लावलेले झेंडे काढून घरात ठेवावे. जेणेकरून आदर्श आचार संहितेचे पालन करता येईल. ज्याला घरावर झेंडा लावायचा असेल त्यांनी पालिकेची अतिक्रमण विभागाची परवानगी घ्यावी. जेणेकरून आचारसंहिता पालन होईल. :- संतोष बिऱ्हाडे, आरोग्य निरीक्षक




